मालवण तालुक्यात सर्वाधिक १७८ मि. मी. पावसाची नोंद…

मालवण तालुक्यात सर्वाधिक १७८ मि. मी. पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 52(1306), सावंतवाडी – 34(1484.10), वेंगुर्ला – 63(1000), कुडाळ – 14(1114), मालवण – 178(1372), कणकवली – 17(1321), देवगड – 22(1129), वैभववाडी – 17(1272), असा पाऊस झाला आहे.

अभिप्राय द्या..