You are currently viewing आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने काेराेना याेध्दाचा सन्मान….

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने काेराेना याेध्दाचा सन्मान….

कुडाळ /-


गेली दिड वर्ष काेराेना महामारीच्या काळात संपुर्ण जगामध्ये हाहाकार माजविला आहे.आपल्या भारत देशात साेबत महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जण कोरोना महामारीने मृत्युमुखी पडलेले आहेत.सरकारने या महामारीचे संक्रमण थांबवावे म्हणुन लाँकडाऊन घाेषीत केले आहे.सर्व व्यवहार थांबल्याने अनेक जणाना आपले राेजगार गमवावे लागले आहेत,अनेक घरातील कर्ता पुरूष साेडुन गेल्याने कुटुंबाची दयनीय अवस्था झाली आहे. याही गंभीर परीस्थिती अनेक डॉक्टर, नर्स,आपल्या जीवाची बाजी लावून अहाेरात्र मेहनत घेत सेवा देत आहेत.
सिधु्ंदुर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यात असलेल्या माणगाव खाे-यातील अतिशय दुर्गम भागात दुकानवाड येथे या काेराेना काळात निस्वार्थि सेवा देणारे डॉ.संजीव गवंडे, डॉ.ज्ञानेश्वर खरुडे, वाडाेस येथे कार्यरत असलेले डॉ.शरद पाटील यांचा आतंरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन ही संस्था नेहमीच समाज हितासाठी कार्यरत असते. संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन काेराेना याेध्दा म्हणुन सन्मानित करण्यात आले.
यावेळीआंतराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन पदाधिकारी ॲड.माेहन पाटणेकर,बाळा काेरंगावकर(श्रीवास क्लीनिकल लँब) माणगाव सहयाेगातुन हँणग्लाेज, सॅनिटायझर,थरमल गनचे वाटप करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदुर्ग जिल्हा महीला अध्यक्षा साै. दर्शना केसरकर,उपाध्यष मिलिंद धुरी,जिल्हा सचिव राकेश केसरकर,बाळा काेरगांवकर, पांडुरंग खरात, अमीत देसाई, संजय परब उपस्थित हाेते.

प्रतिक्रिया व्यक्त करा