आचरा/-
शासकीय जमीनीवरील खाजगी नोंद हटविण्याबाबत आचरा ग्रामपंचायतीने मालवण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाबाबत आचरा देवस्थान कमिटीकडून मालवण तहसीलदारांना निवेदनातून खुलासा देण्यात आला आहे. यात त्यांनी आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पदाचा गैर वापर करून देवस्थान स्थावर जमीन मिळकती संदर्भात वारंवार अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद करून .देवस्थानकडून कायदेशीर मार्गाने असे प्रयत्न हाणून पाडले असल्याचे म्हटले आहे.तसेच आचरा ग्रामपंचायतीने दिलेल्या या निवेदनास आपली हरकत असल्याचे देवस्थान कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासकीय नोंद वहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३एकर जमिन शासकिय जमीन असल्याचे
निदर्शनास येत आहे.
मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खाजगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी त्या वापरात येऊ शकत नसल्याने गावविकासासाठी अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे सदर जमीनीची पुर्नलेखनाखाली सुनावणी करुन सातबारा उतारी शासकीय जमीन म्हणून पुर्ववत करण्याची मागणी आचरा ग्रामपंचायत मार्फत निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली होती. या बाबत आचरा देवस्थान कमिटीकडून अध्यक्ष मिलिंद मिराशी, अशोक पाडावे यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदनातून खुलासा देण्यात आला. या निवेदनात त्यांनी देवस्थान स्थावर जमीन मिळकती संदर्भात वारंवार अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.मौजे गाव पिरावाडी सर्वे नं.१२ वर्णनाची जमीन शासकीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच सदर जमीन खाजगी व्यक्तीने कुळवहीवाट दावा क्रमांक २८/२०१९ मालवण तहसीलदार यांच्या न्यायालयात दाखल करून कुळसदरील नाव चढविल्याचा उल्लेख केला आहे.मात्र या संदर्भात देवस्थान कडून कुळवहिवाट अपिल क्रमांक ३६/२०१९ उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयाकडून आदेश पारित झाले असून तहसीलदार मालवण कुळवहीवाट दावा क्रमांक २८/२०१६मधील आदेश रद्द करण्यात आले आहेत.सदरची प्रत आचरा देवस्थान कडे २०आॅगष्ट २०रोजी प्राप्त झाली आहे . आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनास देवस्थानची हरकत असल्याचे मालवण तहसीलदारांना देवस्थान अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.