शिवसेना ओबीसीसेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांच्या पुढाकाराने 25<br>कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप..

शिवसेना ओबीसीसेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांच्या पुढाकाराने 25
कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप..

मुसळे चारीट्रेबल ट्रस्टच्या वतीने नेरुर, सरंबळ गावातील २५ कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप..

कुडाळ /-

शिवसेना ओबीसी सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांच्या पुढाकाराने मुसळे चारीट्रेबल ट्रस्टच्या वतीने नेरुर सरंबळ गावातील २५ कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप नेरुर शिवसेना पदाधिकारी तथा दशावतारी कला मानधन समिती सदस्य मंजुनाथ फडके यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी रुपेश पावसकर म्हणाले कोरोना काळात मोठ संकट आले असुन यावेळी उपटसु कोण राजकारण करत आहेत त्याकडे लक्ष न देता खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक हे ज्या पध्दतीने कोरोना महामारीत काम करीत आहेत त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून आज आम्ही ही मदत मिळवुन दीली आहे तसेच यापुढे ही शिवसेनेच्या माध्यमातून नेरुर गावासाठी जेवढे सहकार्य करायला मिळेल तेवढे सहकार्य करु असे सांगुन नेरुर सरंबळ पंचक्रोशीत व संपुर्ण मतदार संघात कोरोना रुग्णांसाठी काळजी घेत आमदार वैभव नाईक सातत्याने प्रयत्न करीत आहेत यातच काय ते या कोरोना महामारीच्या संकटात उन लोकांना देवाने बाहेर काढावे अशी प्रार्थना कलेश्वर चरणी करत आहे असे पावसकर म्हणाले.

अभिप्राय द्या..