शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात..


कणकवली /-

तालुक्यातील शाळकरी मुलीसोबत फेसबुकवर झालेल्या ओळखीतून मालवण – कातवड येथील युवकाने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिली असून संशयित आरोपीवर पोक्सो सह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित शाळकरी मुलीची फेसबुकवर संशयित आरोपीशी ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत संशयित युवकाने पीडितेवर जून 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकानी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. संशयित आरोपीला पुणे सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून कणकवली पोलिसांनी सिंहगड येथे जात संशयित आरोपीला आपल्या ताब्यात घेतले आहे. संशयिताला घेऊन कणकवली पोलीस कणकवली च्या दिशेने रवाना झाले आहेत..

अभिप्राय द्या..