वडाचापाटसाठी निधी कमी पडु देणार नाही!; आमदार वैभव नाईक

वडाचापाटसाठी निधी कमी पडु देणार नाही!; आमदार वैभव नाईक

ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न..

मसुरे /-

वडाचापाट ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक याच्या उपस्थितीत संपन्न झाले. वडाचापाट गावच्या विकासासाठी लागणारा निधी यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. वडाचापाट गावचा विकास हा खऱ्या अर्थाने वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला आहे. ग्रामपंचायत स्व मालकीच्या इमारतीच्या माध्यमातून अनेक वर्षांचे ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गावाच्या विकासाचा दृष्टीने ही इमारत खूप महत्त्व पूर्ण ठरणार असल्याचे यावेळी उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी सांगितले.
यावेळी विभाग प्रमख विजय पालव,युवा उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम ,वडाचापाट उपसरपंच तथा पोईप विभाग समन्वयक श्रीकृष्ण पाटकर,ग्रामपंचायत सदस अनंत पाटकर,विद्याधर पाटकर,सुगंधी बांदकर , कमलेश प्रभू,पराग नार्वेकर,भाऊ चव्हाण ,नाना नेरूरकर ,सतीश राठोड , ज्ञानेश्वर वाडकर ,उमेश मुणगेकर,राजकुमार हडकर,दिलीप प्रभुदेसाई ,अमित परब,लक्ष्मण पालव ,दाजी मसदेकर,राजेश हडकर,प्रमोद डोंगरे,प्रमोद पाटकर,पोलिस पाटील विजय पालव ,ग्रामसेवक गर्कल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..