आचरा /-

तौत्के चक्रीवादळाचा फटका आचरे चिंदर गावाला मोठ्या प्रमाणात बसला होता.यात घरावर झाडे पडून वारयाने पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा आपदग्रस्तांच्या मदतीला आमदार वैभव नाईक सरसावले असून त्यांच्या माध्यमातून उपलब्ध सिमेंट पत्र्यांचे वाटप शाखा प्रमुख जगदीश पांगे, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांच्या हस्ते सोमवारी आचरा येथे करण्यात आले. डोंगरेवाडी प्राथमिक शाळेला ही मदत केली गेली . वादळामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या नागरिकांना येत्या काळात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले असल्याचे ग्रामपंचायत सदस्या गांवकर यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page