सिंधुदुर्ग /-
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्रांना प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी कोविड स्थितीची माहिती घेत औषध पुरवठा तसेच एकूण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.कोणत्याही गोष्टीची कमतरता भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.तसेच ज्यांना लक्षणे आहेत त्यांची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी कसाल प्रा.आ. केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा देशपांडे, डॉ.शिवाली राणे, विनोद सावंत,अवधूत मालणकर, डॉ. बालम,सचिन कदम,बाळा कांदळकर, विकास राऊळ,प्रवीण भोगटे,गणेश मेस्त्री, तसेच कडावल येथे जि.प.गटनेते नागेंद्र परब, उपसरपंच विद्या मुंज,आवळेगाव सरपंच सुनील सावंत, वर्दे सरपंच अपर्णा सुतार, तानाजी पालव, अनुराग सावंत, गुरुनाथ मुंज, मंगेश मर्गज, आनंद मर्गज, अमोल सावंत, डॉ.मनीषा चुबे, श्री.करमलकर, सी.आर सावंत, फार्मसिस्ट बांदेकर, आरोग्य सेविका व्ही.बी. सावंत उपस्थित होते. हिर्लोक येथे सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, चंद्रकांत सावंत, बाजीराव झेंडे, डॉ. मनोज चंदनशिव, डॉ. विवेक देशमुख, फार्मासिस्ट प्रवीण गोवेकर, आरोग्य सहाय्यक पुरुषोत्तम तुळसुलकर, पी. जे सावंत उपस्थित होते.