परुळे /-
परुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व वेंगुर्ले तालुक्यातील पहिला सुसज्ज 40 बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात परुळेशाळा नं 3 व कर्ली शाळेमध्ये सुसज्ज विलगीकरण कक्षाची स्थापना ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सनियत्रंण समिती व लोकसहभागातुन करण्यात आली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईनकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी सरपंच सौ.श्वेता चव्हाण उपसरपंच श्री विजय घोलेकर माजीसभापती निलेश सामंत माजी सरपंच प्रदीप प्रभू आरोग्य विस्तार अधिकारी सौ सुलभा गोसावी आरोग्य सहाययक श्री गवंडे प्रसाद पाटकर सदस्य सुनील चव्हाण मनीषा नेवाळकर गीतांजली मडवल शांताराम पेडणेकर केंद्रप्रमुख धनंजय चव्हाण .सचिन देसाई.मनोहर येरम रोहित सुनील म्हापणकर ग्रामसेवक शरद शिंदे यांजबरोबर.ग्रामस्थ उपस्थित होते. कोंविड सेंटर साठी लागणा-या मुलभुत सोईसुविधा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंंचायत सनियंत्रण समितीचे सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणा यांच्या सहकार्यातुन निर्माण करण्यात आलेले आहेत.परुळेबाजार सह कर्ली शाळा येथे विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत यावेळी माजी सभापती निलेश सामंत यांनी कोव्हीड सेंटर साठी रुपये दहा हजार व रोहित सुनील म्हापणकर 5000 व मनोहर येरम यांनी रु2000 ची आर्थिक मदत सरपंच यांजकडे सुपूर्द केली.या कोव्हिडं केअर सेंटर साठी वेतोबा देवस्थान ने दहा हजार व आय आर बी कॅंपनी विमानतळ एकवीस हजार सुशांत सामंत यांनी आर्थिक मदत व डॉ उमाकांत सांमंत डॉ साळगावकर यांनी वस्तू रुपात मदत केली आहे तसेच किशोर मुसळेत ट्रस्ट यांनीही कोरोना प्रतिबंधातमक साहित्य दिले आहे