कोव्हीड सेंटर वाढविण्यापेक्षा रुग्ण संख्या कमी करूया नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचं आवाहन…

कोव्हीड सेंटर वाढविण्यापेक्षा रुग्ण संख्या कमी करूया नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचं आवाहन…

मालवण /-

शासनाने ब्रेक द चेनच्या अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सोबत अजून काही आस्थापना निर्बंधासह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबत आर्थिक घडी लवकरात लवकर सुरु होण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

मालवण शहराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्पीकरद्वारे मास्क वापर, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटाईजर, या त्रिसूत्री बाबत कायम जनजागृती केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तिचा शोध घेवून त्यांची तपासणी करणेकामी पथक नेमले आहे. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे…

फिरत्या विक्रेत्यांची बाजारपेठेत जावून कोरोना स्वॅब तपासणी केली जात आहे आहे. अनावश्यक फिरणाऱ्याना सबक मिळावी म्हणून त्यांची पण स्वॅब तपासणी केली जात आहे. अस असताना काहीजण अजुनही नियम पाळत नसल्याने प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधित कोरोनाचे नियम न पाळल्याने सुमारे ७५ हजार रुपये एवढा दंड वसूल केला गेला आहे. आता पर्यंत सुमारे ७ लाख ८० हजार एवढा दंड वसूल झाला आहे.

अभिप्राय द्या..