कुडाळ /-
कृषी विभागा आणि राष्ट्रीय केमिकल्स अण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड (आरसीएफ) यांच्या वतीने कुडाळ रानबांबुळी येथे खरीप हंगामा मध्ये सुरवातीस बीज प्रक्रिया मोहीम नुकतीच राबविण्यात आली आहे. बीज प्रक्रिया व भात उगवण क्षमता चाचणी तसेच दहा टक्के रासायनिक खत बचत याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले . यावेळी शेतकर्याना प्रात्यक्षिक करुन दाखवुन मार्गदर्शन केले. संतोष रमेश बांबुळकरयांच्या शेतात बीज प्रकिया प्रात्यक्षिक दखविण्यात आले अर सी एफ चे बायोला हे द्रव्य खत २५मिली प्रति किलो हे प्रमाण वापरून भात पिकावर प्रात्यक्षिक करण्यात आले ,व उरलेले ८५० मिली द्रव्य खत भात लावणी सिडिंग स्टेज ७ यावेळी वापरता येईल असे मार्गदर्शन करण्यात आले .करताना वापरवे यावेळी श्रीकृष्ण वाडकर, आर.सी.एफ. जिल्हा प्रतिनिधी, सिंधुदुर्ग
सेल्वेस्टर डिसोझा, आर.सी.एफ नीम कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी, कृषि सहायक प्रिया खरवड़ेकर, कृषि पर्यवेक्षक अर्जुन परब, सरपंच वसंत बांबुळकर,व शेतकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते.बीज प्रक्रिया केल्या मुळे जमिनितून बियाणे द्वारे पसरणा रे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करुन पिकांची वाढ होण्या साठी बीज प्रक्रिया कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे.तसेच बियाणे उगवण क्षमता चाचणी ही शेतकर्यानी पेरणी आधी करावी असे आवाहन केले.तसेच कृषी विषयक इतर योजना .महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा.नारळ.(फळ बाग).लागवड़ी चा चाणजे सजे तील शेतकर्यानी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि पर्यवेक्षक अर्जुन परब यानी केले आहे.