छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अलौकिक : एम.के.गावडे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अलौकिक : एम.के.गावडे

वेंगुर्ला /-


६ जून शिवराज्यभिषेक दिन येथील वेंगुर्ले येथील महिला काथ्या कारखाना येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उद्योजक एम. के.गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना एम. के. गावडे म्हणाले की, वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन हे श्रींचे राज्य होणारच अशी घोषणा करून व सर्व धर्माच्या लोकांना एकत्र करून आदिलशाही, निजामशाही व व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांना नमवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवला.जर परमेश्वराने त्यांना अजून आयुष्य दिले असते, तर दिल्लीचे तख्त त्यांनी काबीज केल असते. त्या काळात एवढया मोठया प्रमाणात फितुरी होत असताना त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. त्यामुळे मराठी माणसाने त्यांच्यातील ते गुण पारखून व अभ्यास करावा. असे झाल्यास आपल्या कोकणचा विकास पर्यायाने महाराष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. असे गावडे म्हणाले. यावेळी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, श्रुती रेडकर,जाधव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..