मुंबई /-
भारतात मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आजवर 79 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती दर्शविणारी असली तरी दुसरीकडे कोरोना मुक्त होणार्यांंची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढत आहे.
सध्याच्या माहितीनुसार देशात 37 लाख 80 हजार 107 रुग्णांंनी कोरोनावर मात केली आहे. यातील 77 हजार 512 जण तर मागील 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत.यानुसार देशातील कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट हा 78 टक्क्यांंवर पोहचला आहे. दुसरीकडे देशात आजच्या घडीला 9 लाख 86 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरु आहे.