महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना
पटोले यांचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून केला साजरा..
मालवण /-
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ज्येष्ठ कार्यकर्ते राम धनावडे, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी संदेश कोयंडे, तालुका उपाध्यक्ष हेमंत माळकर, लक्ष्मीकांत परुळेकर, जेम्स फर्नांडिस, बाबा फर्नांडिस, शेखर डिचोलकर, महेंद्र मांजरेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान काँग्रेसच्यावतीने पटोले यांचा वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कुंभारमाठ येथील शेतकरी बाळा आडवणकर या शेतकर्याचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या बागेत हापूस आंब्याचे झाड लावून वृक्षारोपणही करण्यात आले