मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..

मसुरे /-

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल-४, इलेक्ट्रोनिक्स-०२, तसेच मेकॅनिकलच्या १२ विद्यार्थ्याची निवड झाली. अथर्व इंडस्ट्री इंडिया प्रा.लिमिटेड वाई सातारा या कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल-०१ , इलेक्ट्रोनिक्स-०२ तसेच मेकॅनिकलच्या ०१ विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या बजाज ऑटो पुणे, जनरल इलेक्ट्रीकल मुंबई, फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन टुब्रो मुंबई,अदानी इलेक्ट्रिकल मुंबई, स्मिथ डीटेक्शन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे. महाराष्ट्रातील एकमेव अशा फूड टेक्नॉलॉजी विभागातील २ विद्यार्थ्यांची मुंबई येथील व्ही बडेकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
फूड टेक्नोलॉजी विभागातील नलावडे श्रवण याने सातारा येथे डेअरी प्रोसेसिंग या क्षेत्रात स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले कोविड काळात देखील संस्थेच्या या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे.
या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवडीसाठी इलेक्ट्रोनिक्स विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ. संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखेचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी कोरोना काळामध्ये पण विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अथक प्रयत्न करत आहेत.

अभिप्राय द्या..