त्रिंबक गावात ५ते बारा जून पर्यंत जनता कर्फ्यू ग्रामसनियंत्रण समितीच्या बैठकीत झाला निर्णय..

त्रिंबक गावात ५ते बारा जून पर्यंत जनता कर्फ्यू ग्रामसनियंत्रण समितीच्या बैठकीत झाला निर्णय..

आचरा /-

त्रिंबक गावात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिंबक ग्रामसनियंत्रण समितीने शनिवार पाच जून दुपारी बारा ते शनिवार बारा जून दुपारी बारा पर्यंत संपूर्ण त्रिंबक गावातजनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याची अमंलबजावणी शनिवारी दुपार पासून सुरू झाली आहे.त्रिंबक आणि आजूबाजूच्या गावात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्रिंबक सरपंच आणि ग्रामसनियंत्रण समिती अध्यक्ष विलास त्रिंबककर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी त्यांच्या सोबत पोलीस पाटील सिताराम सकपाळ, उपसरपंच प्रमोद बागवे, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकांत बागवे,आशा स्वयंसेवीका छाया साटम,पुरळकर, विजय सावंत, मेघा साटम,ग्रामसेविका सुर्यवंशी, तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका आदी उपस्थित होते.यावेळी त्रिंबक गावाला कोरोना पासून मुक्त करण्यासाठी गावात संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याचे सरपंच विलास उर्फ राजू त्रिंबककर यांनी स्पष्ट केले. याला उपस्थितांनी पाठिंबा देत शुक्रवारी याची गाडी फिरवू प्रसिद्धी केली गेली असल्याची माहिती त्रिंबक पोलीस पाटील सकपाळ यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..