वेंगुर्ला /-
भाजपा च्या कोकण विकास आघाडी – मुंबई च्या वतीने सिंधुदुर्गातील तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या मदतीचे नियोजन सिंधुदुर्ग भाजपा च्या वतीने करून आठही तालुक्यात ती मदत पोहचविण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातही आलेली मदत जास्तीत जास्त किनारपट्टी भागात पोहचविण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील चिपी,भोगवे,परुळे,कुशेवाडा, मेढा-निवती या भागात यापूर्वीच मदतीचे वाटप करण्यात आले.तसेच म्हापण ग्रामपंचायत हद्दीतील खवणे,पागेरे,मळई,खालचा वाडा या भागातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते पाण्याच्या टाक्या, सिमेंट पत्रे व ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले.तसेच जिल्हा चिटनीस तथा माजी सभापती निलेश सामंत यांनी रोख रक्कमेची मदत केली.भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागात जास्तीत जास्त मदत पोहचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा चिटनीस निलेश सामंत,पं.स.सदस्या गौरवी मडवळ,कुशेवाडा उपसरपंच व ता उपाध्यक्ष निलेश सामंत,युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर, अनु.मोर्चा ता.अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण,कामगार आघाडीचे विजय ठाकुर,ग्रा.प.सदस्य संजोग परब, संदीप खोत, प्रविण ठाकुर,रविंद्र नांदोसकर, चर्मकार समाज अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण,सुदेश केनवडेकर,जगन्नाथ चौधरी , काशिनाथ कोचरेकर इत्यादी उपस्थित होते.यावेळी म्हापण ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ४५ नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदतीचे वाटप करण्यात आले.