सीमा बंदी असताना देखील दोडामार्ग तालुक्यात दारू नक्की येथे तरी कुठून ?

सीमा बंदी असताना देखील दोडामार्ग तालुक्यात दारू नक्की येथे तरी कुठून ?

पेट्रोल मिळणे अशक्य दारू मिळणे मात्र शक्य…..

कोरोनाने मांडलेल्या थैमानात शासनाने कडक निर्बंध लादत लॉकडाऊन घातले असून या लॉकडाऊन काळात शासनाने सीमा बंदी देखील केली आहे, त्यातच दोडामार्ग तालुका हा गोवा व कर्नाटक ह्या राज्याच्या सीमांलगत असल्याने दोडामार्ग मध्ये गोवा लगत दोडामार्ग व आयी अशा दोन ठिकाणी चेक पोस्ट असून व कर्नाटक लगत विजघर अशा तीन ठिकाणी दोडामार्ग मध्ये चेक पोस्ट उभारत सीमा बंदी केली आहे, त्यातच दोडामार्ग तालुका हा गोवा राज्याच्या लगत आहे व गोवा राज्य हे दारू व्यवसायासाठी प्रसिध्द असून गोवा राज्यातून महाराष्ट्र,कर्नाटक अशा दोन्ही राज्यांना दारू पुरवली जाते त्यातच आता सीमा बंदी देखील असून दोडामार्ग तालुक्यात गावो-गावी लॉकडाऊन काळात देखील राजरोसपणे दारू विक्री केली जाते,सीमा बंदी काळात नागरिकांना पेट्रोल मिळत नाही परंतु दारू मात्र गावोगावी मिळते, असे काहीसे चित्र दोडामार्ग मध्ये निर्माण झालेले दिसत आहे नक्की ही दारू येथे तरी कुठून असा प्रश्न संतप्त झालेल्या नागरिकांना मध्ये उपस्थित झाला असून ह्या प्रश्ना समोर देखील प्रश्न चिन्हच उपस्थित आहे.
दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग,भेडशी अशा दोन ठिकाणी मोठ्या बाजारपेठा असून अगोदर ह्या दोनच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू व्यवसाय केला जायचा व गावोगावी मात्र किरकोळ प्रमाणात विक्री केली जायची परंतु आता मात्र लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात गावो-गावी दारू विक्री केली जाते त्यामुळे दारू व्यवसायात मोठ्या प्रमाणात तेजी आलेली दिसत आहे.
तर एके ठिकाणी वाहन धारकांना पेट्रोल मिळत नाही परंतु दारू मात्र सहजरित्या मिळते असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे, कोरोनाचा वाढता थैमान पाहता शासनाने अनेक कडक निर्बंध लादले असताना देखील दोडामार्ग तालुक्यात ही दारू वाहतूक नक्की कोणत्या मार्गाने होते याचा शोध अध्याप देखील लावला नसल्याने तात्काळ याचा शोध घेत यावर कडक कारवाई करावी अशी मागणी दोडामार्ग तालुक्यातील संतप्त नागरिकांन कडून होत आहे.

अभिप्राय द्या..