सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १९ हजार ९३१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.