घोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी

घोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी

दोडामार्ग /-

विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे संबंधित विभाग हा चांगलाच चर्चेत असतो. घोटगे परिसरात विद्युत विभागाचे लक्षच नसल्याचे सध्या प्रकर्षाने दिसत असून,या भागातील विद्युत पोल हे अखेरच्या घटका मोजताना दिसत आहेत अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी दिली आहे.
आवडे येथील मेन ट्रान्सफॉर्मर वरून घोटगे येथील त्या विद्युत पोलवर लाईन आलेल्या आहेत दोन्ही पोल पूर्ण पणे वाकले असून ती लाईन फक्त नदीपात्रातील पाण्यात जायची शिल्लक आहे.त्या ठिकाणी गावातील ग्रामस्थ शेती कामासाठी नेहमी ये जा करत असतात.पाऊस तोंडावर आला असून कधीही ते पोल खाली पडून मोठी दुर्घटना घडू शकते.तरी संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देत विद्युत खांब तात्काळ बदलावे अशी मागणी डॉ.दळवी यांनी केली आहे

अभिप्राय द्या..