जिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

जिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /-

जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश असतानाही कुडाळात शासनाच्या मुदतीनंतर दुकाने उघडी ठेऊन व्यवसाय करणारे दोघे व एक विनामास्क अशा तिघांवर आज दिवसभरात पोलिसांनी कारवाई केली.यात गजानन लाडू भाईप रा.आंदुर्ले कापडोसवाडी यांनी आपले पिंगुळी उत्कर्षनगर येथील महालक्ष्मी गँस दुरूस्तीचे दुकान दु.११.५० पर्यंत चालू ठेवले.याप्रकरणी सुवर्णा कदम यांनी कुडाळ पोलिसात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच रूपेश गुरूनाथ सारंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ईरफान ईसाक मणियार रा . गणेशनगर कुडाळ हे कुडाळ शिवाजीनगर येथे विनामास्क फिरताना आढळले.तर ईसाक एहमद जाफर रमणेद रा मज्जिद मोहल्ला हे शासनाच्या मुदतीनंतर कुडाळ जिजामाता चौक येथे फळे विक्री करताना आढळले. या घटनेची फिर्याद नाठेबा हिप्परकर यांनी दिली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या भादवि कलम १८८ अन्वये कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

अभिप्राय द्या..