कुडाळ /-
कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी डांबरी रस्त्याला चिकटून तर काही ठिकाणी रस्ता डॅमेज करून BSNL च्या केबल तोडून जेसीबी द्वारे चर मारला जात आहे.पावसाळ्याच्या तोंडावर होणारे हे काम पावसाळ्यात वाहानधारकांसोबतच पादचार्यानांही या कामाची आता डोकेदुखीचे ठरणार आहेपावसाळ्यात गाडी साईडपट्टीवर उतरुच शकणार नाही, एकतर ती रुतणार कींवा वेगात ओव्हरटेक करत असेल आणि चाक रस्त्याखाली उतरले तर १००% अपघात हा होणार आहे.यामुळेच अबघाताला आमंत्रण हे नक्की आहे.याबाबत आज रविवारी ३० मे,रोजी कुडाळ शहरातील पत्रकार तथा उद्योजक श्री. राजन नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका जाधव मॅडम यांचे या कामासंदर्भात आज कुडाळ येथे लक्ष वेधले आहे.आणि या संदर्भातील तक्रार ही त्यांच्याजवळ केली आहे.यासंदर्भात त्यांनी देखील नाराजी वर्तविली आहे.असे उद्योजक रानज नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.