कुडाळ /-
हुमरमळा वालावल गावात कोरोना महामारीत ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कोरोना महामारीत काम करताना मदत झाली असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले आहेत,हुमरमळा वालावल ग्रामपंचायत येथे कोरोना नियंत्रण समिती सभेमध्ये श्री बंगे बोलत होते यावेळी सरपंच सौ अर्चना बंगे,उपसरपंच स्नेहलदीप सामंत, ग्रामसेविका श्रीमती अपर्णा पाटील, हुमरमळा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ श्रध्दा परब, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई, आरोग्य सेविका सौ चव्हाण, पोलीस पाटील श्री उमेश शृंगारे उपस्थित होते.या वेळी हुमरमळा वालावल गावातील कोरोना वाढु नये यासाठी जी खबरदारी घेऊन कामे केली त्या कामांचा आढावा ग्रामसेविका श्रीमती पाटील यांनी नियंत्रण समिती समोर ठेऊन काही सुचना वैगरे असल्यास त्या अमलात आणल्या जातील असेही सभेत सांगण्यात आले.हुमरमळा वालावल गावातील व्यापारी व ग्रामस्थ चांगल्या प्रकारे सहकार्य देत असुन या काळात तरुण लोकही चांगले सहकार्य करीत असुन माझे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी चांगले सहकार्य करीत आहेत असे सरपंच सौ अर्चना बंगे बंगे यांनी सांगुन गावाच्या मध्येच कोविड सेंटर दोन दीवसात सुरु करीत असुन कोरोना ची लक्षणे कमी परंतु पाॅझीटीव्ह पेशंट अशांना या सेंटरमधे ठेवले जाईल असेही सौ बंगे यांनी सांगितले.हुमरमळा वालावल गावातील मुख्यतः जाग्यावर सॅनिटायझर करुन घेतले जात आहे असेही सौ बंगे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.