नानेली सरपंच व गावाच्या वतीने निर्माण केलेले कोविड सेन्टर हे कुडाळ तालुक्याचे पहिले भुषण त्यामुळे खरोखरच गावाचे मनापासून आभार–तहसिलदार अमोल पाठक
कुडाळ /-
कोरोनाची लाट आणि वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नानेलीसारख्या छोट्याश्या गावातून सरपंच व आणि गावाच्या वतीने सुरू केलेले कोविड सेंन्टर हे कुडाळ तालुक्यातील पहिले कोविड सेन्टर हे सुरू केल्याने नानेली गाव हे कुडाळ तालुक्याचे भुषण असल्याचे गट विकास अधिकारी श्री विजय चव्हान यांनी म्हटले आहे
माणगांव खो-यात नानेली सारख्या गावातून 25 बेडचे कोविड सेन्टर सुरू करणे हे खरच कुडाळ तालुक्याला अभिमानास्पद आहे हे मी तहसिलदार म्हणून कधीच विसरू शकत नाही हे या गावचं काम आणि कार्य हे गावचे भुषण आहे खरोखरोच स्वयंसेवक म्हणून काम करणा-या दोन्ही स्वयंसेवकाचे मी अभिनंदन करतो–तहसिलदार
माझी केंद्र शाळा नानेली नं 1 घेऊन कुडाळ तालुक्यातील पहिले कोविड सेंन्टर सुरू केले त्यामुळे माझ्या शिक्षकांकडून सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर सर यांनी दिले,यावेळी तहसीलदार श्री.अमोल फाटक,बीडीओ विजय चव्हाण,जि.प. प्रा क्षिणाधिकारी एकनाथ आंबोकर, श्री गोडे ,मंडलअधिकारी जी ए भोये,शिक्षीका शेडगे मॅडम, पोलिस पाटील संजय धुरी ग्रामसेवक सौ.माणगांवकर, विस्तार अधिकारी सखाराम सावंत ,श्री विशाल धुरी स्वयमसेवक,खरूडे, मेस्त्री,युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी आदी उपस्थित होते.