वेंगुर्ला /-
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिटणीस व माजी सभापती निलेश सामंत यांच्या सहकार्याने तौक्ते चक्रीवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले, त्या परिसरातील कर्ली व किल्लेनिवती येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली.त्यानंतर परुळेबाजार , चिपी,कर्ली,किल्लेनिवती,भोगवे तेरावळे,कुशेवाडा येथील नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाना आधार म्हणून ताडपत्री, पत्रे, रोख रक्कम,पाण्याची टाकी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,मच्छिमार नेते वसंत तांडेल,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुस्कर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत,प्रकाश राणे,शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे,माजी सरपंच प्रदीप प्रभू,आप्पा राठीवडेकर ,शेखर राणे,गणपत माधव ,संतोष करलकर,राजू दूधवडकर,दिगंबर केसरकर, रमेश गावडे,विजय पाटकर, प्राजक्ता चिपकर,रक्षिता गोवेकर,दिपक दूधवडकर,आप्पा राठीवडेकर,सुभाष घोलेकर,कृष्णा करलकर,पांडू मांजरेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.