वेंगुर्ला /-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने अॅड. लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल वेंगुर्ले व सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले आनंदवाडी येथील ५०० व्यक्तींना अर्सेनिक अल्बम-३०चे वाटप करण्यात आले.वेंगुर्ले आनंदवाडी येथील नागरिकांना लोकनेते दता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. पूजा कर्पे यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम -३० गोळयांचे वाटप करण्यात आले. सामाजिक अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे, नियमित मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे, तसेच घरात रहा सुरक्षित रहा, अशी माहिती घरोघरी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयाचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी विलास जाधव, तलाठी धनंजय गोरड, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर, सचिव सचिन वराडकर,खजिनदार सावळाराम भराडकर, दलित समाज सेवा मंडळ, आनंदवाडी वेंगुर्लेचे पदाधिकारी वाय.जी. कदम, विठ्ठल जाधव, गजानन जाधव, सखाराम जाधव, जयंत जाधव, संदीप जाधव तसेच होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी शुभम जाडकर, सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते.होमिओपॅथिकच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व डॉक्टर यांनी सहकार्य केले.