मसुरे /-
मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रामपंचायत येथे ४५ वर्षावरील ग्रामस्थांना कोविड लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच विलास उर्फ राजू त्रिंबककर, उपसरपंच प्रमोद बागवे, ग्रामसेविका सौ सुरेखा सूर्यवंशी, आरोग्य सेविका श्रीमती स्नेहा पुजारे, श्रीमती सावंत, आशा सेविका छाया साटम, अनघा पुरळकर, पोलीस पाटील सीताराम सकपाळ, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.