कांदळगाव येथे कोविड लसीकरण शुभारंभ!

कांदळगाव येथे कोविड लसीकरण शुभारंभ!

मसुरे /-

कांदळगाव आरोग्य उपकेंद्र येथे कोविड लसीकरण शुभारंभ करण्यात आला. १०० जणांना याचा लाभ मिळाला. मसूरे आणि मालवण आरोग्य केंद्र येथे लस घेण्यास जाण्यासाठी जेष्ठ नागरिक यांना रिक्षा भाडे आणि नंबर लावण्याकरिता पहाटे जावे लागत होते. यामुळे रूग्णकल्याण समिती मसुरे अध्यक्ष सौ सरोजताई परब व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कडे पाठपुरावा करण्यात आला होता. यावेळी सरपंच सौ उमदी उदय परब, उपसरपंच आनंद आयकर, माजी उपसरपंच बाबू राणे, झोनल अधिकारी विजय जाधव, आरोग्य सेविका दिव्या पांजरी, निता गोसावी, आशा कांबळी, आरोग्य सेवक सिद्धेश धुरी, पोलीस पाटील शितल परब, भाग्यश्री डिचवलकर, संध्या कांदळगावकर, स्वाती बेलवलकर, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन सुर्वे, आशिष आचरेकर, अपर्णा पाटकर, आदिंनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

अभिप्राय द्या..