वेंगुर्ला /-

वेंगुर्लेत ‘भाजपा सेवा सप्ताहाचा’ शुभारंभ भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शहरातील कोव्हिड सेंटरला १० वेपोरायझर कीट भेट देऊन करण्यात आला.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,सेवा सप्ताह जिल्हा संयोजक – जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई ,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.कोरोना महामारीचा मुकाबला करताना ” संघटन ही सेवा ” या उपक्रमा अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यामधील कोव्हिड सेंटरला ७० वेपोरायझर कीट देण्यात येणार आहेत .व त्याचा शुभारंभ आज वेंगुर्ले शहरातील कोवीड सेंटरला १० वेपोरायझर कीट भेट देऊन शुभारंभ करण्यात आला. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब,वंचित,दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदुताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवाकार्य करुन पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करतात.यावर्षी पंतप्रधानांचा सत्तरावा जन्मदिवस आहे.राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२० पर्यंत सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप , सेवा सप्ताह जिल्हा संयोजक तथा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई ,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक,ज्येष्ठ नेते बाळा सावंत,नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, नगरसेविका साक्षी पेडणेकर,जिल्हा सदस्य सोमनाथ टोमके, मच्छिमार सेलचे ता.अध्यक्ष बाबा नाईक, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, ता.चिटनीस समीर चिंदरकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व हसीना बेन मकानदार,शक्ती केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर केळजी, किसान मोर्चा चे प्रफुल्ल प्रभु, बुथप्रमुख शेखर काणेकर,नितीश कुडतरकर,प्रकाश मोटे, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री,बाळकृष्ण मयेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page