कुडाळ /

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे . संपूर्ण देशभर 14 सप्टेंबर 2020 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधी मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. या सेवा सप्ताहा मध्ये किसान मोर्चा म्हणून प्रत्येक मंडलनिहाय वृक्षारोपण व वृक्ष वाटप हा कार्यक्रम घ्यावा अशी सूचना मा.जिल्हाध्यक्ष श्री.राजनभाई तेली यांनी दिलेल्या आहेत.त्या संदर्भात नियोजनाची बैठक सोमवार दिनांक 14/09/2020 रोजी सकाळी 10.30 वाजता कुडाळ मराठा समाज हाॅल – तळमजला येथे आयोजित केलेली आहे.तसेच ही बैठक संपल्यावर किसान मोर्चा ,सिंधुदुर्गच्या वतीने सेवा सप्ताहाचा शुभारंभ व्रुक्षारोपण करुन होणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व किसान मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील मराठा समाज हाॅल – तळमजला येथे उपस्थित रहावे .

सदर बैठकीस जिल्हा सरचिटणीस व सेवा सप्ताह जिल्हा संयोजक श्री.प्रसन्ना उर्फ बाळू देसाई मार्गदर्शन करणार आहेत.तरी या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्षांनी व किसान मोर्चा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन श्री.उमेश सावंत ,जिल्हा सरचिटणीस,श्री.बाळासाहेब सावंत,जिल्हाध्यक्ष – किसान मोर्चा,श्री.प्रसन्ना उर्फ बाळू देसाई जिल्हा सरचिटणीस भाजपा जिल्हा संयोजक सेवा सप्ताह. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page