मालवण /-

तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्गात धडकल्यापासून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाला सूचना करत नागरीकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अनेक नुकसान ग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत केली.सलग गेले आठ दिवस त्यांचा हा दिनक्रम सुरु असून आज त्यांनी मालवण तहसील कार्यालय, कृषी विभाग, वीजवितरण कार्यालय, मालवण कोविड सेंटर याठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. तहसील कार्यालय येथे नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. पंचनामे अपूर्ण असतील तर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरणकडून सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. लोकांच्या वीज संबंधित समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी केल्या. तसेच मालवण कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाबी जोगी, तपस्वी मयेकर,कृषी अधिकारी श्री. कांबळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील, कार्यकारी अभियंता श्री. मोहिते, सहाय्यक अभियंता सौ. गिरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पावरा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page