सावंतवाडी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन..

सावंतवाडी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन..

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरातील रहीवासी युवा सामाजिक कार्यकर्ते अमित उर्फ लवू लक्ष्मण नाईक (३६, रा. खासकीलवाडा) यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. पहाटे पाचच्या सुमारास त्रास जाणवत असल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
त्यांच्या पश्चात आई, दोन विवाहित बहीणी, मामा असा परिवार आहे. सावंतवाडी वटसावित्री मंडळाचे ते सक्रीय कार्यकर्ता होते. रक्तदानासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किराणा वितरक चंद्रशेखर शितपनाईक, आनंद शितप नाईक, प्रशांत शितप नाईक यांचा ते चुलत भाऊ होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..