कणकवली /-

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी २५ मे.रोजी कणकवली येथिल आम.वैभव नाईक यांच्या कार्यालयात सातवा वेतन आयोग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या कर्मचारी वर्गाला लागू करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. आणि आपल्या मागण्या संदर्भात चर्चा देखील केली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातित कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचान्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच महाराष्ट्र शासनाचे दि. 23/03/2017परिपत्रकानुसार,आपणास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी अधिकारी संयुक्त संघटनेच्या कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.याचा विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्या असे सांगण्यात आले.

सध्या देश व राज्य कोरोना महामारीच्या राष्ट्रीय आपत्तीने ग्रासले असून अशा कठीण परिस्थिती समई अत्यावश्यक सेवेत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी अधिकारी है राज्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्याचे काम अहोरात्र आपला जीव धोक्यात टाकून करीत आहे अनेक कर्मचारी अधिकारी या कामामध्ये असताना कोरोना विषाणू महामारीची लागन होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.तरीही कर्मचारी आपली सेवा चोख बजावत आहे.असे असतांनाही या कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोगापासून वंचित ठेवले आहे आज सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास अडीच वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे तरीपण सातवा वेतन आयोग लागू झाला नाही असे सदरच्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी निवेदन देते वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्ग चे उपअभियंता श्री.धिरज बेंडखळे ,उपअभियंता (यां) ,श्री. प्रणित जयस्वाल ,सहाय्यक अभियंता श्री. संतोष पालशेतकर कनिष्ठ लिपिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page