तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी..

तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या.तौक्ते वादळा नंतर अवकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.रविवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजेरी लावली.अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतीची कामे रखडली होती.गेले दोन तीन दिवस पाऊस गेल्यामुळे शेतकऱ्यांनी गवत भरणे,घरे दुरुस्ती करणे,लाकडे भरणे ही कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात.मात्र मे महिन्याच्या सुरुवाती पासून अवकाळी पाऊस वैभववाडी तालुक्यात सुरू झाला आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.असाच पाऊस सुरू राहिला तर भात पेरणी केलेले भात 100% रुजून येणार नाही.तालुक्यात दरवर्षी सर्वात जास्त पाऊस पडतो.1 मे पासून 2 ते 3 दिवासाच्या फरकाने पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.येत्या आठ दिवसात पावसाळी भात पेरण्या शेतकरी करण्याची शक्यता आहे.

अभिप्राय द्या..