श्यामसुंदर सावंत आणि मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपत ओरोस कोविड सेंटरला केले सुरक्षा किटचे वाटप..

श्यामसुंदर सावंत आणि मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपत ओरोस कोविड सेंटरला केले सुरक्षा किटचे वाटप..

कुडाळ /-

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत निवेदक तसेच पोखरण शाळा नं. १ चे शिक्षक व पोखरण गावचे सुपुत्र शामसुंदर सावंत व पोखरण ग्रामपंचायत सदस्य मंदार सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत.पोखरण गावातील जिल्हा रुग्णालय,तसेच उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटरच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सेवा पुरवत असलेल्या १२ सुरक्षा रक्षकांना कोरोणा पासून सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा किटचे वाटप केले .त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी शिक्षक शामसुंदर सावंत. पोखरण ग्रामपंचायत सदस्य मंदार सावंत ,महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती अध्यक्ष विजय गुरव, तुकाराम सावंत, अनिल सांवत,सीताराम टिळवे,सौ.गायकवाड व इत्तर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..