२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन..

२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन..

मालवण /-


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका शाखा , शहर शाखा व गाव शाखा यांना जिल्हाशाखेच्यावतीने आवाहन करण्यात येते की कोविड १९ च्या प्रभावामुळे सामाजिक आरोग्य जपण्यासाठी यावर्षीची बुद्ध जयंती आपापल्या घरी साजरी करावी .गावात विहार असल्यास फिजिकल डिस्टन्स राखून साध्यापद्धतीने जयंती साजरी करावी असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा शाखा अध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी.साथीचा प्रभाव वाढल्यामुळे अनेक गावात पेशंट सापडत आहेत त्यांना स्वताचे आरोग्य जपून काळजी घेऊन मदत करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या धम्माचे मूलतत्त्व बंधुता करूणा मैत्री आहे .यापूर्वी आपण सर्वांनी गरजूना मदत केली आहे यावेळीही आपण जवळपासच्या लोकांना मदत करावी.ही आपत्तीही अनित्य आहे ,नष्ट होणारी आहे असे नमूद केले आहे

अभिप्राय द्या..