सिंधुदुर्ग /-
आजच्या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट हातून घडल्याचे समाधान आहे. सिंधुभूमी रुग्ण सेवा समिती आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मध्ये आज ‘स्वर्गीय मनोहर पर्रिकर कॅन्सर प्रकल्प’ चालवण्याविषयीचा महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही मुंबईतील एक अग्रगण्य धर्मादाय संस्था असून १९६९ पासून भारतभर ‘Total management of Cancer’ हे ध्येय घेऊन , रुग्णांचे स्क्रिनींग पासून पुनर्वसन पर्यंतचे काम ही संस्था करीत आहे. आता सिंधुभूमी रुग्ण सेवा समितीच्या आमच्या प्रमोद जठार यांनी संस्थापिलेल्या या सृजनशील प्रकल्पाला या संस्थेचे मार्गदर्शन आणि सहभाग लाभणार आहे. हा प्रकल्प स्थायी नसून ग्रामपंचायतीच्या आवारात जाणार असल्याने त्याचे दुरगामी सकारात्मक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागातील सामान्यातल्या सामान्य माणसाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत!