कुडाळ /-
शिवसेनेच्या वतीने आज शनिवारी २२ मे रोजी, कुडाळ शहरात सिमेंटच्या पत्र्याचे वाटप करण्यात आले.मंत्री तथा शिवसेना नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून व पालक मंत्री उदय जी सामंत खासदार विनायक जी राऊत आमदार आमदार वैभवजी नाईक यांच्या प्रयत्नातून शिवसेना कुडाळ तालुक्यामध्ये मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. यावेळी शुभारंभ करताना शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोभाटे जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परक जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत विकास कुडाळकर अतुल बंगे ,रुपेश पावसकर ,राजू गवंडे ,संजय भोगटे , संतोष शिरसाट ,कृष्णा धुरी ,पावशी सरपंच बाळा कोरगावकर ,दीपक आंगणे, इतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.