सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १६ हजार ४१२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.