कुडाळ तालुक्यातील नेरुर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून संविता आश्नम आणावं येथे धान्य वाटप..

कुडाळ तालुक्यातील नेरुर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून संविता आश्नम आणावं येथे धान्य वाटप..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील आणावं येथील संविताश्रमाला नेरुरमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा धान्यरुपात मदतीचा हात,मिळाला आहे.अणाव येथील संविता आश्रमाला कोरोनाच्या पाश्वभूमीवर तातडीची गरज ओळखून नेरुरमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पुढाकाराने धान्य रुपात मदत करण्यात आली.हे धान्य नेरूर मधील रिक्षा मालक अनिल नेरूरकर यांनी आपल्या रिक्षेतून हे धान्य आश्रम मध्ये पोच केले. कोरोनाच्या कठीण काळात आश्रमाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नेरूर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रतिसाद दिला आहे.

अभिप्राय द्या..