वेंगुर्ला /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे यांच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्राना इंटरनेटसेवा मिळावी,अशी मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नानोसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यात त्यांनी म्हटले आहे कि, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावर लस पुरविल्या जात आहेत.त्यामुळे प्रशासनावर जास्त प्रमाणात ताण निर्माण होत आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेट सेवेमुळे वंचित रहावे लागत आहे.अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे यांच्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांना इंटरनेट सेवेअभावी या लसीकरणासाठी अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे आपल्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना डिजिटल इंडिया अंतर्गत आलेल्या इंटरनेट पोर्टलवरुन उपकेंद्राना तात्काळ इंटरनेट सेवा मिळावी,यासाठी प्रयत्न करावेत.जेणेकरुन ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर लसीकरण होईल व आरोग्य प्रशासनालाही मदत मिळेल,असे म्हटले आहे.