कुडाळ /-
“रूग्ण सेवा” हिच “ईश्वर सेवा” माणून आपल्या कार्यात स्वतःला झोकून देत आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपल्या सुख – दुःखांची परवा न करता समोर आलेल्या *प्रत्येक रुग्णाची आईच्या मायेने आणि बहिणीच्या स्नेहाने शुश्रुषा करणाऱ्या “परिचारिका माता भगिनींचा” आणि त्यांच्या निस्वार्थी सेवेचा “जागतिक परिचारिका दिना” निमित्त भारतीय जनता पार्टी ओरोस मंडलाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथील HA,HVश्री.व्ही.बी.ठाकर, आरोग्य सहाय्यक श्रीम.के.जी.पवार, HQ,ANM श्रीम.आर.आर.साळगावकर, ANMश्रीम.व्ही.बी.राठोड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीम.मान्यता कुंटे, गतप्रवर्तक श्रीम.स्मृती कुंभार, औषध निर्माण अधिकारी श्री.डी.बी.मस्के, क्लार्क श्री.आर.आर.चव्हाण, वाहनचालक श्री.एन.व्ही.गोसावी, परिचर श्री.एस.के.सावंत इ. परिचारिका आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचा यथोचित सन्मान जेष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना बिस्किटे आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेंद्र सामंत, सतीश माडये, लक्ष्मीकांत राणे, किरण मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नालंदा काजरेकर, डॉ. आश्विनी खोत, पत्रकार प्रसाद पाताडे, पत्रकार गुरू दळवी इ. उपस्थित होते.