सिंधुदुर्ग /-
सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रोज रूग्ण संख्येत वाढ होत आहे.तसेच सिंधूदूर्ग जिल्हा हा अतीदुर्गम भाग आहे.कोरोना रूग्णांना या ठिकाणी आवश्यक उपचार करण्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे कोवीड रूग्णांना वेळीच उपचार मिळण्यास अडचणी येतात.ही समस्या दूर करण्यासाठी सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील विवीध स्तरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना ग्रस्त रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत या मागणीमुळे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे स्वःता तातडीने मुंबईला जाऊन गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्रजी आव्हाड यांची भेट घेतली व सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात ५० बेडचे कोवीड सेंटर ऑक्सिजन बेड.व्हेंटिलेटर सह कोकण म्हाडा विभागातर्फे उभारण्यात यावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना.श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पञ देऊन जिल्ह्य़ातील वाढता कोरोना प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या यावर चर्चा करून सविस्तर माहिती दिली.
या मागणीनुसार सिंधूदूर्ग जिल्ह्यासाठी कोकण म्हाडा विभागा मार्फत कोरोना रूग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी तातडीने कोवीड सेंटर उभारून तेथील रूग्णांना वेळेत उपचार मिळणेसाठी खास बाब म्हणून सोय करण्यात येईल.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना ना.जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितले.