श्री बाबा मोंडकर यांचे ग्रामपंचायती व नगरपालिकांना आवाहन…
सिंधुदुर्ग जिल्हा हा १९९७ साली महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्याला केंद्र शासनानेही मान्यता दिली महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मोठा गाजावाजा करून मान्यता मिळविलेल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पर्यटन प्रकल्प आजही अपूर्ण स्थितीत आहेत. मात्र नियोजनाअभावी सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या म्हणावा तितका विकास झाला नाही. आपसातिल असमन्वयाच्या व शासकीय अनास्थेचा फटका सिंधुदुर्गच्या पर्यटनाला बसतोय. ठराविक गावे व ठराविक जलक्रिडेला व्यवसाय वगळता जिल्ह्याचा काहीअंशी सोडून सर्वच भाग हा पर्यटनदृष्ट्या विकासाच्या प्रतिक्षेत आहे. समृद्ध वारसा असूनही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या सिंधुदुर्गाच्या वाट्याला फारसे काही येत नसल्याचे चित्र आहे. पर्यटनाला चालना, स्थानिकांना आश्वासक रोजगार आणि कानाकोपऱ्यातील पर्यटनातिल दुर्लक्षित ठिकाणे भटकंतीच्या नकाशावर आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाने सर्वांनां एकत्र रित्या येऊन पर्यटन विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयात काम केलेल्या तत्कालीन उप संचालक नीलाताई लाड तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे उप संचालक हनुमंत हेडे यांनी या कमी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व प्रक्रियेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत,नगरपालिका, नगरपरिषद यांना मेल द्वारे आपल्या गावाचा,शहराचा पर्यटन विकास आराखडा बनविण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. तसेच माहिती भरून देण्यासाठी ऑनलाईन फॉर्म पाठविण्यात आला आहे. या माध्यमातुन प्रत्येक गाव व शहरात पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीच,अग्रौ, हिस्ट्री, कल्चर, फूड, अँडव्हेंचर ,मेडिकल टुरिझम च्या माध्यमातुन देशविदेशी पर्यटक खेचण्याचि प्रचंड क्षमता आपल्या जिल्ह्यात आहे गरज आहे सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची यांसाठी जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंच व नगराध्यक्ष यांनी गावाचा पर्यटन विकास आराखडा बनऊन सहकार्य करा असे आवाहन श्री बाबा मोंडकर,अध्यक्ष सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे.