मालवण /-
सुकळवाड श्री.हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुकळवाड प्राथमिक शाळा येथे आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
याप्रसंगी अवधूत मालवणकर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, उपतालुका प्रमुख प्रसाद मोरचकर, उपसरपंच स्वप्नील गावडे, सागर कुशे आदी उपस्थित होते.