कुडाळ /-
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणा बाबत आज कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनां निवेदन दिले आणि दि. 1 मे 2021 पासून राज्यभरात 18 ते 44 वयोगटोतील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरण करून घेणेसाठी Cowin Portal वर नोंदणी करून आगाऊ वेळ निश्चित करणे बंधणकारक आहे.अशा रीतीने वेळ आरक्षित करते वेळी Portal वर पिन कोट प्रविष्ट केल्यानंतर नजीकची लसीकरण केंद्रे व तिथे उपलब्ध असणारे डोस यांची माहिती येते व आपल्या सोयीनुसार वेळ आरक्षित करता येते,परंतु, गेल्या काही दिवसांत या सुविधेमूळे बाहेरील जिल्हातील नागरिकांनी सिंधुदुर्ग जिल्हात slot book करून लस घेतल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मुळातच लसीच्या डोसांचे वितरण लोकसंख्येच्या प्रमाणात होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी डोस उपलब्ध होतात.त्यामुळे अश्याप्रकारे बाहेरील जिल्हातील नागरिकांनी सिंधुदुर्ग जिल्हात लस घेतल्यास येथील स्थानिक नागरिकांना लसीपासून वंचित रहायला लागू शकते.तरी माझी आपणांस नम्र विनंती आहे की, सिंधुदुर्ग जिल्हात उपलब्ध होणारे डोस जिल्हातील नागरिकानांच प्राधान्याने उपलब्ध होण्यासाठी Cowin Portal च्या आज्ञावलीत योग्य ते बदल करणे किंवा इतर कोणतीही आवश्यकती कार्यवाही करण्यात यावी, अशा रीतीने जिल्हातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन व्हावे असे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.