नवी दिल्ली /-
संपूर्ण जगभरातील नागरिक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. रशियाात कोरोना लसीचे डोज नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही, ही लस पहिल्या टप्प्यातील लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे. एका रिपोर्टनुसार रशियानं घोषणा केली आहे की २०२०-२१ मध्ये एक बिलियन म्हणजेच १०० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, आता 2021 पर्यंत देशात कोरोनावरील लस उपलब्ध होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
कोरोनाची लस पुढील वर्षी 2021 च्या सुरुवातीला उपलब्ध होईल, अद्याप कुठलिही तारीख निश्चित करण्यात आली नाही, पण 2021 च्या सुरुवातील लस येणार असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं. लवकरात लवकर लस उपलब्ध करण्यासाठी रणनिती आखण्यात येत आहे. जेष्ठ नागरिक आणि जोखिम पत्करत काम करणाऱ्या व्यक्तींना कोविड 19 च्या लसीचा आपत्कालीन परिस्थितीत लाभ देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण कशाप्रकारे करता येईल, यासाठी राष्ट्रीय पातळीवर शासन दरबारी रणनिती आखण्यात येत असल्याचेही हर्ष वर्धन यांनी सांगितले.
रविवारच्या संवाद या कार्यक्रमात हर्ष वर्धन यांनी आपल्या सोशल मीडियावरी फोलोअर्ससोबत संवाद साधला. कोविड 19 लसीच्या टीकाकरणासाठी सावधानता बाळगण्यात येत आहे. लसीची सुरक्षा, टीकाकरण, इक्विटी, कोल्ड चैन गरज, उत्पादन वेळ सीमा यांसारख्या मुद्द्यांवरही गंभीर चर्चा होत असल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
रशियाने विकसीत केली लस
ब्लादिमीर पुतिन यांनी ११ ऑगस्टला स्पुतनिक व्ही ही लस लॉन्च केली होती.याशिवाय या लसीच्या परिणामकारकतेबाबतही सांगण्यात आले होते. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांनी आपल्या मुलीलाही ही लस दिल्याचा दावा केला होता. ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इंन्स्टिट्यूटनं विकसित केली आहे. वैद्यकिय नियतकालिक लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या ट्रायल दरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या आल्या.
रशियातील लसीचे निर्यात रशियातील आरडीआयएफनं ब्राजीलसह इतर देशांमध्ये लसीच्या निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या व्यतिरिक्त कजाकिस्तानसोबतही करार करण्यात आला आहे. सुरुवातीला २० लाखपेक्षा अधिक लसीचे खुराक खरेदी करण्यासाठी तयार असून नंतर ५० लाख डोज मागवण्याची शक्यता आहे.रिपोर्ट्सनुसार भारतात रशियन लसीचे ३० कोटी डोज उत्पादित केले जाणार आहेत. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. या महिन्यात या लसीची चाचणी भारतात होणार आहे. रशियनन डायरेक्टर इनवेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रिव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासह संयुक्त अरब, सौदी अरब, फिलीपींस आणि ब्राजिलमध्ये या महिन्यापासून चाचणीला सुरूवात होणार आहे.