मसुरे ,/-
मुलाच्या निधना नंतर तीनच दिवसांनी आईचेही निधन झाल्याची घटना वेरली नमसवाडी येथे घडली आहे. येथील दीपक रामचंद्र जाधव (५० वर्ष) यांचे १८ एप्रिल रोजी गोवा बांबुळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले. दीपक जाधव यांच्या निधनाची धक्का बसून त्यांच्या मातोश्री स्नेहलता रामचंद्र जाधव (७५ वर्ष) यांचेही २१ एप्रिल रोजी मुंबई येथे निधन झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे. बागायत परिसरात हॉटेल व्यावसाईक म्हणून काम करणाऱ्या दीपक जाधव यांची अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना खाजगी दवाखान्यातून बांबुळी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते.मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे रविवारी त्यांचे निधन झाले. मुलाचे निधन झाल्याची बातमी दीपक यांच्या आईला मुंबई येथे समजल्या नंतर मानसिक धक्का बसून बुधवारी त्यांचे सुद्धा निधन झाले.स्नेहलता यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.