बदाम खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते हे आपल्याला माहिती आहे. रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. हेच फायदे भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने देखील मिळतात. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये पुर्णपणे अब्जॉर्ब होतात. फिट आणि निरोगी राहण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवलेल्या शेंगदाण्याचे सेवन करावे. जाणून घेऊया…
– रात्री भिजलेले शेंगदाणे सकाळी सेवन केल्याने गॅस आणि ऍसिडिटीची समस्या दूर होते.
भिजलेल्या शेंगदाण्याच्या पोटॅशियम, मॅग्नीज, कॉपर, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियमने प्रमाण असते. यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत होते.
– गुडघेदुखीची समस्या असल्यास रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे खावे. यामुळे गुडघेदुखीवर आराम मिळतो.
– कंबरदुखीची समस्या दूर करण्यासाठी रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे खावेत.
Health Tips – झोपण्यापूर्वी ‘या’ 7 गोष्टींचे सेवन चुकूनही करू नका, आताच व्हा सावधान
– भिजलेले शेंगदाणे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे याचे रोज सेवन करावे.
– भिजलेल्या शेंगदाण्यात अनेक फायदेशीर गुणतत्व आढळतात. त्वचा तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी भिजलेल्या शेंगदाण्याचे रोज सेवन करा.
Health Tips – आवळा रस अनेक आजारांवर आहे गुणकारी, जाणून घ्या 7 फायदे
– भिजलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ऍनिमिया असणाऱ्या रुग्णांना याचे रोज सेवन करायला हवे.
– भिजलेले शेंगदाणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे नजर तीक्ष्ण होते.
Health Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच सोडा
– तब्येत वाढवायची असल्यास रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे आणि सोबत हरबरा डाळ याचे सेवन करावे. यामुळे साईज आणि वजन वाढण्यास मदत होते.(सेवन करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)