वेंगुर्ला / –

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस – बेहेरेवाडीमध्ये भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले.
तुळस – बेहेरेवाडी येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच याच कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने संपुर्ण बेहेरेवाडी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपुर्ण परिसरात होऊ नये म्हणून तातडीने भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तुळस सरपंच शंकर घारे यांनी पुढाकार घेऊन सावंतवाडीच्या संजु विरनोडकर टीमला पाचारण करून संपुर्ण बेहेरे वाडीतील आठ ते दहा घरे व आजुबाजूचा परीसर सॅनि टरायझर ची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले .
जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपुन भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याचे प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी सांगितले.यावेळी संजु विरनोडकर टीमचे सागर मळगांवकर , तुळस तलाठी ए.टी.गावडे , चंद्रकांत बेहेरे , रुपेश बेहेरे, आदित्य बेहेरे, विनायक बेहेरे, नितीन बेहरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page